दमलेल्या बाबाची ही कहाणी...
कोमेजून निजलेली एक परी राणी,
उतरलेले तोंड डोळा सुटलेले पाणी ||1||
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजताच तरी पण येशील खुशीत
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला …
ला..ला ला..ला..ला.. ला ला..ला.. ला..ला… ||2||
आटपाट नगरात गर्दी होती भारी
घामाघूम राजा करी local ची वारी
रोज सकाळीस राजा निघताना बोले,
गोष्ट सागायचे काल राहुनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परी येणार मी वेळेतच घरी
स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी
खर्या खुर्या परीसाठी गोष्टीतली परी
बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला …
ला..ला ला..ला..ला.. ला ला..ला.. ला..ला… ||3||
ऑफिसात उशिरा मी असतो बसून
भांडवले डोके गेले कामात बुडून
तास तास जातो खाल मानेने निघून
एक एक दिवा जातो हळूच विजून
अशावेळी की सांगू काय काय वाटे
आठवासोबत पाणी डोळ्यातून दाटे
वाटते कि उठूनिया तुज पास यावे
तुझ्यासाठी मी पुन्हा लहानही व्हावे
उगाचच रुसावे नि भांडावे तुझाशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझाशी
उधळत खिदळत बोलशील काही
बघताना भान मला उरणार नाही
हासुनिया उगाचच ओरडेल काही
दुरूनच आपल्याला बघणारी आई
तरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा
क्षण क्षणा वर ठेवू खोडकर ठसा
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला …
ला..ला ला..ला..ला.. ला ला..ला.. ला..ला… ||4||
दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई
मऊ-मऊ दूध भात भरवेल आई
गोष्ट ऐकायला मग येशील न अशी
सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी
कुशी माझी सांगत आहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तूझं पास नाही
जेऊ माखू न्हाऊ खाऊ घालतो ना तुला
आईपरी वेणी-फनी करतो ना तुला
तूझंसाठी आईपरी बाबापण खुळा
तोही कधी गुप चूप रडतो रे बाळा
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला …
ला..ला ला..ला..ला.. ला ला..ला.. ला..ला… ||5||
कोमेजून निजलेली एक परी राणी,
उतरलेले तोंड डोळा सुटलेले पाणी ||1||
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजताच तरी पण येशील खुशीत
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला …
ला..ला ला..ला..ला.. ला ला..ला.. ला..ला… ||2||
आटपाट नगरात गर्दी होती भारी
घामाघूम राजा करी local ची वारी
रोज सकाळीस राजा निघताना बोले,
गोष्ट सागायचे काल राहुनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परी येणार मी वेळेतच घरी
स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी
खर्या खुर्या परीसाठी गोष्टीतली परी
बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला …
ला..ला ला..ला..ला.. ला ला..ला.. ला..ला… ||3||
ऑफिसात उशिरा मी असतो बसून
भांडवले डोके गेले कामात बुडून
तास तास जातो खाल मानेने निघून
एक एक दिवा जातो हळूच विजून
अशावेळी की सांगू काय काय वाटे
आठवासोबत पाणी डोळ्यातून दाटे
वाटते कि उठूनिया तुज पास यावे
तुझ्यासाठी मी पुन्हा लहानही व्हावे
उगाचच रुसावे नि भांडावे तुझाशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझाशी
उधळत खिदळत बोलशील काही
बघताना भान मला उरणार नाही
हासुनिया उगाचच ओरडेल काही
दुरूनच आपल्याला बघणारी आई
तरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा
क्षण क्षणा वर ठेवू खोडकर ठसा
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला …
ला..ला ला..ला..ला.. ला ला..ला.. ला..ला… ||4||
दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई
मऊ-मऊ दूध भात भरवेल आई
गोष्ट ऐकायला मग येशील न अशी
सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी
कुशी माझी सांगत आहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तूझं पास नाही
जेऊ माखू न्हाऊ खाऊ घालतो ना तुला
आईपरी वेणी-फनी करतो ना तुला
तूझंसाठी आईपरी बाबापण खुळा
तोही कधी गुप चूप रडतो रे बाळा
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला …
ला..ला ला..ला..ला.. ला ला..ला.. ला..ला… ||5||
No comments:
Post a Comment